गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्यात दुरावा अल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चा सुरू असतानाच तृप्तीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नावात बदल केला. तिनं जाधव हे आडनाव काढून टाकलं.त्यामुळं चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. असं असलं तरी सिद्धार्थनं या सर्व अफवा असल्याचंही म्हटलं आहे.
सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्या नात्याबद्दल या चर्चा सुरू असल्या तरी सिद्धार्थ त्याच्या लेकींसोबत नुकताच दुबईला गेला होता. त्याच्यासोबत तृप्ती देखील होती. पण दोघांचा एकत्र फोटो मात्र पाहायला मिळाला नाही. सिद्धार्थ आणि तृप्ती यांनी अद्यापही यावर बोलणं टाळलं आहे.
सिद्धार्थ आणि तृप्ती यांच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच चर्चा होतेय असं नाहीय. यापूर्वी देखील अनेकदा दोघं चर्चेत आले आहेत. पण त्याची कारणं वेगळी होती. कपल गोल्स देणारं जोडपं म्हणून दोघांकडं पाहिलं जात होतं. दोन वर्षांपूर्वी तृप्तीच्या वाढदिवसाला सिद्धार्थनं एक पोस्ट शेअर करत तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
काय म्हणाला होता सिद्धार्थ?
सिद्धू ते सिद्धार्थ जाधव हा प्रवास तुझ्यामुळे आणखी सुखकर झालाय आणि प्रवास अजूनही तुझ्या सोबतीने सुरू आहे . आणि मी हा प्रवास आत्मविश्वास करू शकतो कारण तू माझ्यासोबत आहेस. मी अभिमानाने सांगत असतो की माझ्या आयुष्याचा बॅक बोन माझी बायको आहे. आणि ते शंभर टक्के खरं आहे.घर, संसार, इरा, स्वरा, यांना सांभाळण्यापेक्षा ही “मला” सांभाळणं खूप कठीण आहे हे तुलाही माहितीये आणि मलाही.
असं म्हणत सिद्धार्थनं त्याच्या आयुष्यातील तृप्तीचं स्थान अधोरेखित केलं होतं.