काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव लोकसभा खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी राज्यातील सत्तानाट्य नेमकं कसं सुरु झालं याचं कारण सांगतिलं आहे. संवादाचा अभाव हे प्रमुख कारण असल्याचं धानोरकर म्हणाले.

हायलाइट्स:
- राज्यातील सत्तानाट्यावर काँग्रेस खासदाराचं भाष्य
- बाळू धानोरकर यांनी कारण सांगितलं
- शिवसेना आणि एकनाथ शिंदे शह काटशाह सुरु
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हायचं असं सांगितल्यास भाजपला देखील थांबाव लागेल, असं धानोरकर म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष सुरु राहावं असं वाटतं. शिवसेना आमदार आणि मंत्री, काँग्रेस मंत्री आणि आमदार यांच्या संवादाचा अभाव दिसून आला यामुळं भाजपचा राज्यसभा आणि विधानपरिषदेत एक अतिरिक्त उमेदवार विजयी झाला,असं धानोरकर म्हणाले.
शिवसेनेचा मोठा निर्णय, बंडखोर आमदारांना शेवटचा चान्स, अन्यथा कारवाई अटळ
काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले यांच्याकडे जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याचा प्रश्न नाही. मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नव्हते, असं म्हणता येणार नाही, असं धानोरकर म्हणाले. विसंवाद असल्यानं हे सर्व घडलं असावं, असं सुरेश धानोरकर म्हणाले. आमदार साडेतीन लाख लोकांची मत घेऊन विजयी होतात. त्यांना काम करताना अडचणी आल्यास त्या पक्षनेतृत्त्वाला सांगितलं जातं. त्यांनी त्या सोडवल्या नाहीत तर बंडखोरी होते.प्रत्येक काम एक व्यक्ती करु शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी ज्या व्यक्तीला काम दिलं असेल तो व्यक्ती आमदारांच्या अडचणी सोडवू शकला नसेल, असं सुरेश धानोरकर म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फुटले नाहीत, असं धानोरकर म्हणाले.
शिवसेनेचा फायरब्रँड नेताही फुटला, ‘शिंदेशाही’ गटात आणखी एक कॅबिनेट मंत्री
दरम्यान, शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आमदारांना सायंकाळी ५ वाजता उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांवर शिवसेना काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.
‘मला जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं’; नितीन देशमुखांच्या गंभीर आरोपानंतर एकनाथ शिंदे म्हणाले…
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : congress mp suresh alias balu dhanrkar said miscommunication is responsible for political crisis in maharashtra
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network