मुंबई: अभिनत्री प्राजक्ता माळी हिची ‘रानबाजार’ (Raanbaazaar) ही वेब सीरिज अलीकडेच प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित झाली आहे. महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Political Crisis) यावर आधारीत ही सीरिज त्यासंदर्भातील विविध घटनांचे दर्शन घडवते. कोणत्याही थरापर्यंत राजकारण पोहोचू शकते असे कथानक या सीरिजमध्ये आहे. दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने याच वेब सीरिजमधील काही प्रसंग तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. त्यामध्ये काही वाक्यही तिने शेअर केली आहेत, जी महाराष्ट्रातील आजच्या राजकीय परिस्थितीशी साधर्म्य दाखवणारी आहेत.

हे वाचा-‘परत जाऊ नका म्हणजे मिळवलं..’, एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर अभिनेत्याचा सल्ला

प्राजक्ताने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केलेल्या व्हिडिओची सुरुवात मकरंद अनासपुरे यांच्या डायलॉगने होते. यात ते म्हणतायंत की, ‘सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही. खोटी आश्वासनं, अभद्र युत्या याची लोकांना सवय झाली आहे. पक्षनिष्ठा, पक्षाची तत्त्व या सगळ्या पुस्तकी गोष्टी झाल्या आहेत.’ मकरंद अनासपुरेंचा पुढे असा डायलॉग आहे की, ‘पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा.’

त्यानंतर या व्हिडिओमध्ये एका वृत्तनिवेदिकेचा आवाज येतो. त्यांचे शब्द असे आहेत की, ‘महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ. युसूफ पटेल आणि निशा जैन यांच्यासह ४२ आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे महाराष्ट्रात अवघ्या दीड दिवसात सरकार कोसळलं.’

हे वाचा-Rainbow शूटिंगसाठी सज्ज, ‘धर्मवीर’ स्टार प्रसाद ओकला या अभिनेत्याने केलं रिप्लेस

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केलेला व्हिडिओ-

VIDEO: ‘पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी…’, काय म्हणतेय प्राजक्ता माळी?

‘महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ’, ‘सरकार संकटात’, ‘मोठा रानबाजार सुरू आहे’, अशी काही वाक्य देखील तिने या व्हिडिओद्वारे शेअर केली आहेत.

प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम

प्राजक्ता माळीने अशावेळी हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावेळी राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. सध्या महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं असून त्यांच्यासोबत जवळपास ४० आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. दरम्यान राज्यात शिवसेना देखील शिंदेंच्या विरोधात आक्रमक झाली आहे. बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

हे वाचा-‘आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा’, सरकार धोक्यात आल्यानंतर कंगनाचं वक्तव्य चर्चेत

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर देखील सातत्याने बैठकी सुरू आहेत. याठिकाणी बुधवारी संध्याकाळी ५ वाजता पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी उपस्थित राहावे. अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here