मुंबई: दिग्दर्शक नेहमीच राजकीय आणि सामाजिक विषयांवर बेतलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन करताना दिसतात. त्यांच्या ‘आश्रम’ या वेबसीरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता झा नव्या सीरीजकडे वळले आहेत.
‘’ असं नाव असलेल्या त्यांच्या सीरीजमध्ये ज्येष्ठ अभिनेते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सीरीजच्या माध्यमातून नाना वेबविश्वात पदार्पण करत आहेत. त्यामुळे हा प्रोजेक्ट नानांसाठी खास असणार आहे.
आगामी सीरीजमध्ये ते राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रकाश झा आणि नाना पाटेकर या जोडीनं यापूर्वी ‘अपहरण’, ‘राजनिती’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे ही जोडी आता ओटीटीवर काय कमाल करते, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.