Maharashtra Political Crisis : सध्या महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. 35 पेक्षा जास्त आमदारांसह शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहेत. संध्याकाळी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. शिवसेनाही बंडखोरीवर आक्रमक झाली आहे. बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून (Shivsena) कारवाई सुरू करण्यात आली आहे. बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकीय वातावरण तापलेय. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात बैठका झाल्या. अशातच कल्याण डोंबिवलीमधून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे.
‘अनाथांचा नाथ एकनाथ, हिंदू रक्षक… आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत..’ निर्णय काहीही असो आम्ही सदैव शिंदे साहेबांसोबत आहेत.. अशा प्रकराची पोस्टरबाजी होत आहे. या पोस्टरवर उद्धव ठाकरे यांचा फोटो दिसत नाही… सर्व पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि दिघे यांचे फोटो दिसत आहेत.. पोस्टरबाजीतून अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. सोशल मीडियावरही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्ट होत आहेत..
साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं …..
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेच्या गोटात शांतता पसरली होती .शिवसेना पदाधिकारी , शिवसानिकांमद्ये संभ्रमाचे वातावरण आहे . , कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे वर्चस्व आहे एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा गट कल्याण डोंबिवली मध्ये आहे .आज डोंबिवलीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी बॅनर लावले आहेत .शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग्ज लावत एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागलं. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.
Hindutwa Hindutwa Hindutwa Some People Dont like Hindutwa… But these legends Like Hindutwa and Hindutwa Never Leaves them… #ShivsenaMLA #AnandDighe #Rajthackeray #BalThackeray #EknathShinde #MVA @Rajput_Ramesh pic.twitter.com/gm6EhXkoLU
— 𝑷𝒖𝒔𝒉𝒑𝒂𝒓𝒂𝒋 𝑲𝒖𝒍𝒂𝒊 (@pushparajkulai) June 21, 2022