मुंबई- अक्षयकुमारचा बहुचर्चित सम्राट पृथ्वीराज सिनेमा बॉक्सऑफीसवर काही चालला नाही. पण आता अक्षयकुमारच्या नव्या सिनेमाची जोरात चर्चा सुरू झाली आहे. रक्षाबंधन हा अक्षयकुमारचा नवा सिनेमा लवकरच येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सिनेमात चार बहिणींची जबाबदारी घेणारा भाऊ अशी अक्कीची भूमिका आहे.

धर्मवीरमध्ये एकनाथ शिंदे साकारणाऱ्या अभिनेत्याचा संताप

या सिनेमाच्या निमित्ताने अक्षयकुमारच्या खऱ्या आयुष्यातील बहिणीशी त्याचं नातं कसं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. अल्का भाटिया ही अक्षयकुमारची धाकटी बहिण असून तिच्यासोबतचे फोटो बॉलिवूड खिलाडी दरवर्षी रक्षाबंधन सणाला शेअर करत असतो. मात्र एक काळ असा होता की अक्षय त्याच्या या लाडक्या बहिणीवर खूप् नाराज झाला होता. यामागचं कारणही खास होतं.

अल्का भाटिया

सिनेमात येण्यासाठी बॉलिवूड खिलाडीने अक्षयकुमार हे नाव घेतलं असलं तर प्रत्यक्षात राजीव भाटिया असं अक्षयचं नाव आहे. अक्षय आणि त्याची बहिण अल्का यांचे खूप फोटो चाहत्यांना शेअर होत असतात. अक्षयकुमारची ही बहिण सिनेमाइंडस्ट्री आणि प्रसिध्दीच्या वलयापासून लांब आहे. सध्या ती प्रॉडक्शन हाउस चालवते. अक्षयच्या आईचं निधन झालं तेव्हा याच बहिणीने अक्कीला खूप मोठा आधार दिला होता. अक्षय बहिण अल्कावर खूप प्रेम करतो. पण काही वर्षापूर्वी अक्षयच नव्हे तर सारं भाटिया कुटुंब अल्कावर नाराज झालं होतं. अक्षयकुमारही त्याच्या या लाडक्या बहिणीशी बोलत नव्हता. पण आता मात्र त्यांच्यातील अबोला दूर झाला आहे.

अल्का भाटिया

अल्का भाटिया हिचं पहिलं लग्नं यशस्वी झालं नाही. तिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्यानंतर अल्का अक्षयच्या घरी येऊन राहिली. त्यानंतर ती तिच्या आवडीच्या क्षेत्रात काम करत असताना असं काही घडलं की तिच्यावर कुटुंबीय नाराज झाले. अल्काने तिच्यापेक्षा वयाने १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या उद्योजक सुरेंद्र हिरानंदानी यांच्याशी लग्न केलं.


सुरेंद्र यांचंही ते दुसरं लग्न होतं आणि त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. अल्काला तिच्या पहिल्या लग्नापासून सिमर नावाची मुलगी आहे. सध्या ती परदेशात शिक्षण घेत आहे. पण सुरेंद्र यांच्याशी लग्नाच्या निर्णयामुळे अक्षयही तिच्यावर नाराज झाला होता. पण अल्काच्या हट्टापुढे त्याचं काही चाललं नाही. अखेर माघार घेत अक्षय अल्काच्या या लग्नाला तयार झाला.


लवकरच प्रदर्शित होणाऱ्या रक्षाबंधन या सिनेमात अक्षयच्या खांद्यावर चार बहिणींची जबाबदारी असल्याचं पाहायला मिळणार आहे. अक्षयची ही भूमिका पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. एवढंच नाही तर जेव्हा पहिल्या लग्नाच्या घटस्फोटानंतर अक्षयची बहीण अल्का माहेरी आली होती तेव्हाही अक्षयने ही भूमिका खऱ्या आयुष्यात निभावली आहे. अल्का ही अक्षयला राजू या नावाने हाक मारते.

‘परत जाऊ नका म्हणजे मिळवलं..’, एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर अभिनेत्याचा सल्ला

निस्वार्थ प्रेम!, सिनेमा पाहून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही रडू आलं, नेमकं असं काय घडलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here