महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून आज विधिमंडळाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांवर कारवाई आज उद्धव ठाकरेंच्या गटानं कारवाई केल्यास कायदेशीर प्रश्न निर्माण होणार आहेत.

हायलाइट्स:
- राज्यातील सत्तासंघर्ष निर्णयाक वळणावर
- एकनाथ शिंदे यांच्याकडून भारत गोगावले प्रतोदपदी
- अजय चौधरींच्या निवडीवर आक्षेप
उद्धव ठाकरे शिंदे समर्थक आमदारांवर कारवाई करणार?
सुनील प्रभू यांनी आज सकाळी शिवसेना आमदारांना बैठकीसंदर्भात पत्र पाठवलं आहे. आमदारांना सायंकाळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांवर कारवाई आज उद्धव ठाकरेंच्या गटानं कारवाई केल्यास कायदेशीर प्रश्न निर्माण होणार आहेत. आमदारांवर कारवाई झाल्यास महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष कोर्टात प्रकरण जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांचं थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान, आ. भरत गोगावलेंकडे महत्त्वाची जबाबदारी
एकनाथ शिंदे यांचा अजय चौधरींच्या निवडीला आक्षेप
एकनाथ शिंदे यांच्यासह ३४ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना अजय चौधरी यांच्या निवडीवर आक्षेप घेणार पत्र पाठवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिवसेनेचे गटनेते पद म्हणून अजय चौधरींची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत गोगावले यांना प्रतोद म्हणून नियुक्त करुन सुनील प्रभू यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असं एकनाथ शिंदे जाहीर केलं आहे. ३१ ऑक्टोबर २०१९ ला एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली होती, ती निवड पुढं कायम ठेवावी, असं शिंदे समर्थक आमदारांनी म्हटलं आहे.
‘मला जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं’; नितीन देशमुखांच्या गंभीर आरोपानंतर एकनाथ शिंदे म्हणाले…
एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर आमच्यासोबत असल्याचं म्हटलं होतं.आता या आमदारांनी महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्टाचार, अनिल देशमुख, नवाब मलिक यांची प्रकरण आणि मराठीचा मुद्दा उपस्थित करुन काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडण्यासाठी आणखी कारणं स्पष्ट करण्यात आली आहेत.
‘भाजप आणि एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांचं सरकार, देवेंद्रजी मुख्यमंत्री’
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : maharashtra political crisis eknath shinde letter to deputy speaker replace sunil prabu may be reach to court
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network