CM Uddhav Thackeray Speech: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. शिवसेनेकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, एकनाथ शिंदे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यामुळे उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हमध्ये काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती.

हायलाइट्स:
- २०१२ साली बाळासाहेब ठाकरे गेले
- २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रतिकूल परिस्थितीत एकट्याने लढून ६३ जागा जिंकल्या
- त्यानंतर अनेकजण मंत्री झाले
यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात पुकारलेल्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीविषयी भाष्य केले. यावेळी त्यांनी शिवसेना आणि हिंदुत्व हे एकमेकांमध्ये गुंफले गेले आहेत, ते एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत, असे निक्षून सांगितले. हिंदुत्वासाठी कोणी काय केलं, हे सांगण्याची ही वेळ नव्हे. पण विधिमंडळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलणार मी पहिला मुख्यमंत्री असेन, याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी आपण आमदारांना भेटीसाठी वेळ देत नसल्याच्या मुद्द्याचाही प्रतिवाद केला. मुख्यमंत्री भेटत नाही, असे बोलले जाते. काही दिवसांपूर्वीची परिस्थिती बोलाल, तर हे सत्य होते. त्यावेळी माझी शस्त्रक्रिया झाली होती. ते दोन-तीन महिने विचित्र होते. मी कोणालाही भेटू शकत नव्हतो. तेव्हा मुख्यमंत्री भेटत नव्हते हे बोलणे , योग्य होते. पण आता मी सगळ्यांना भेटायला सुरुवात केली आहे. त्यानंतर माझं कामं व्यवस्थित सुरु आहे. मी मुख्यमंत्रीपदी बसलो तेव्हा नवखा होतो, मला कोणताही अनुभव नव्हता. पण मी जिद्दीच्या जोरावर परिस्थिती सांभाळली, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : cm uddhav thackeray speech slams eknath shinde and rebeal shivsena leaders
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network