राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना, एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली असताना राजकीय घडामोडी वेगात सुरू आहेत. भाजपसोबत युती करा अशी मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांची संख्या वाढू लागली आहे. आता खासदार भावना गवळींनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

 

shiv sena mp bhavna gawli appeals to cm thackeray
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • आमदारांच्या मागण्यांचा विचार करून निर्णय घ्यावा
  • खासदार भावना गवळींची ठाकरेंना विनंती
  • शिंदेंच्या बंडखोरीनंतर गवळींचं ठाकरेंना पत्र
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी सुरू आहेत. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर अस्तित्वाचं संकट निर्माण झालं आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. भाजपसोबत जाऊया, अशी भूमिका बहुतांश भूमिका आमदार घेत आहेत. आता खासदारदेखील आमदारांच्या सुरात सूर मिसळू लागले आहेत.

यवतमाळच्या खासदार भावना गवळींनी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. कठीण असला तरी शिवसेनेसाठी निर्णय घ्या, अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. ‘सद्यस्थितीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे आपण व्यथित झाला आहात. पक्षापुढे आलेल्या संकटामुळे आपणासमोर खूप मोठे आव्हान असल्याची कल्पना मला आहे. एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनातही खंत आहे,’ असं गवळींनी पत्रात म्हटलं आहे.
मुख्यमंत्रिपदच काय, पक्षप्रमुखपदही सोडेन; वर्षा सोडून मातोश्रीवर जाईन- उद्धव ठाकरे
‘आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्यासाठी विनंती करत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमत: हाडामासाचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कोणतीही कठोर कार्यवाही न करता कठीण असला तरी शिवसेनेसाठी निर्णय घ्यावा ही नम्र विनंती’, असं गवळींनी पत्रात नमूद केलं आहे.
CM Uddhav Thackeray: ‘२०१४ नंतर मंत्रिपदं उपभोगलीत, ती बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेमुळे मिळाली, हे लक्षात ठेवा’
भावना गवळींचा शिंदेंच्या सूरात सूर
बंडखोरी केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे वारंवार हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. भाजपसोबत पुन्हा युती करावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार करत आहेत. गवळींनी त्यांच्या पत्रात भाजपचा उल्लेख केलेला नसला, तरीही त्यांनी शिंदे आणि त्यांच्या समर्थकांच्या सूरात सूर मिसळला आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात गवळी ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या कार्यालयांवर, त्यांच्याशी संबंधित संस्थांवर ईडीचे छापे पडले आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : consider the demands of rebel mlas shiv sena mp bhavna gawli appeals to cm uddhav thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here