मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फेसबूक लाईव्हमधील महत्त्वाचे मुद्दे…
– शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य, एकनाथ शिंदे अयोध्येला गेले. हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री.
– ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरवण्यात आली. २०१४ एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे आमदार निवडून आले ती पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मध्ल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने.
– काही आमदारांचे फोन येतात. काल परवा निवडणुक झाली. हॉटेलमध्ये लघु शंकेला गेला तरी शंका. मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम करणारा आहे. पवार साहेबांनी सांगितले, सोनियाजींचा आग्रह म्हणून मुख्यमंत्री झालो. नुसता स्वार्थ नव्हता.
– सत्तेसाठी एकत्र आलो. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला.
– शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला करोना झालाय मी राजीनामा देतो तुम्ही घेऊन जा. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन.
– शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी.
– समोर या बोला. आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी पद सोडायला तयार आहे. आयुष्याची कमाई पद नाही. त्यामुळे समोर या आणि माझ्याशी बोला…
– एकाने जरी माझ्याविरुद्ध मतदान केलं तरी माझी हार. त्यामुळे माझ्या समोर या आणि मला सांगा मी पद सोडेन
– मी राजीनामा तयार ठेवला आहे. आजपासून माझा मुक्काम मातोश्रीवर हलवतो.
– सध्याचं राजकारण म्हणजे रडकुंडीचा डाव
हिंदुत्वाचा रोष, बाळासाहेबांची भक्ती पण उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड; काय चाललंय एकनाथ शिंदेंच्या मनात?