म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोना रुग्णसंख्येमध्ये मुंबई ,ठाणे, पुणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये वाढ दिसत असली तरीही राज्यातील एकूण रुग्णसंख्येमध्ये मुंबईमधील उपचाराधीन रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते.

८ ते १४ जून या कालावधीमध्ये राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या १९,३०४ इतकी असताना मुंबईमध्ये ११,८१३ रुग्णांची नोंद झाली होती. १५ ते २१ जून या काळात राज्यात २६,३४४ उपचाराधीन रुग्ण असताना मुंबईमध्ये १४,१४६ रुग्णसंख्या असल्याचे आरोग्यविभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. १५ ते २१ जून या कालावधीमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये एकूण २४,८७१ उपचाराधीन रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे १४,१४६ रुग्णांची नोंद झाली आहे.

८ ते १४ जून दरम्यान ही संख्या ११,८१३ इतकी होती. या दोन आठवड्यांची तुलना केली असता १९.७५ टक्क्यांची वाढ दिसून येते. राज्यातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या या आठवड्यामध्ये २६,३४४ इतकी असताना मुंबईमध्ये १४,१४६ तर ठाणे येथे ६,१८३, पुण्यात २,३५४, रायगडमध्ये १,४३१ तर पालघरमध्ये ७५७ उपचाराधीन रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन रुग्णसंख्येमध्ये ३४.२६ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येते.

अशी आहे उपचाराधीन रुग्णस्थिती

जिल्हा- रुग्ण

मुंबई १४,१४६

ठाणे ५,५६९

पुणे २,११३

रायगड १,०४६

पालघर ७५९

नागपूर ३१७

नाशिक १७८

अहमदनगर ७६

रत्नागिरी ५९

सिंधुदुर्ग ५९

औरंगाबाद ५८

लातूर ५१

चंद्रपूर ४५

उपचाराधीन रुग्ण – २४,६१३

रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण -११४१

सौम्य लक्षणे असलेले – उपचाराधीन रुग्णांच्या ९५.३६ टक्के

गंभीर रुग्ण – १.११ टक्के

आयसीयुमधील रुगण- ०.६२ टक्के

व्हेन्टिलेटरवरील रुग्ण – ०.०९ टक्के

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here