एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट निर्माण झालं आहे. पक्ष आणि सरकार वाचवण्याचं आव्हान ठाकरेंसमोर आहे.

 

uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • शिंदेंच्या बंडामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरुच
  • सोबत ४६ आमदार असल्याचा शिंदेंचा दावा
  • ठाकरेंसमोर पक्ष आणि सरकार वाचवण्याचं आव्हान
मुंबई: शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माझ्यासोबत ४६ आमदार आहेत आणि आणखी १० आमदार येतील, असा दावा शिंदेंनी काल गुवाहाटीच्या विमानतळाबाहेर केला. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील हे नेते शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का बसला. आता सेनेचे आणखी दोन आमदार नॉट रिचेबल झाले आहेत.

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर गुवाहाटीकडे निघाल्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. सदा सरवणकर माहिम मतदारसंघाचे आमदार आहेत. ते तीनवेळा विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत. २००४ मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर गेले. मात्र २००९ मध्ये त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी ते स्वगृही परतले. यानंतर त्यांनी २०१४, २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली.
खरंच हिंदुत्त्व की ईडीत्त्व-आयटीत्त्व? शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपैकी ‘ही’ नावं पाहाच!
मंगेश कुडाळकर शिवसेनेचे कुर्ल्याचे आमदार आहेत. २०१४ मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. २०१९ मध्येदेखील ते विजयी झाले. कुडाळकर हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे कुडाळकरांनी शिंदे गटात जाणं मातोश्रीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सकाळपर्यंत माझा विचार नव्हता. मात्र आता काही कारणास्तव जावं लागत असल्याचं कुडाळकरांनी सांगितलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra political crisis shiv sena mlas mangesh kudalkar and sada sarvankar not reachable
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here