पुणे: लॉकडाऊनमध्ये लष्कर परिसरातील रस्त्यावर मास्क न घालता कुत्र्यांना फिरवणे काही जणांस चांगलेत महागात पडले आहे. या नागरिकांवर थेट गुन्हे दाखल केल्यानंतर सात जणांना लष्कर न्यायालयाकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

वाजीद नासिर शेख (वय ३१, रा. लष्कर), अमन अमजद शेख ( वय १९), मोहमद तलाहा जमादार ( वय ३४, रा. भवानी पेठ), हेमंत राजेश चव्हाण (वय २२ रा. भवानी पेठ), आजीम अकबर शेख ( वय ३२, रा.नानापेठ), सिद्धार्थ मनोज रायजादा (वय २९ ), अलीम अलताफ पटेल (वय ३०, रा. लष्कर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शहरात संचारबंदी लागू आहे. तसेच, बाहेर पडताना नागरिकांनी मास्क परिधान करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मास्क न परिधान करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. संबंधित सातही जण लष्कर भागातून रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करून फिरत होते. नाकाबंदीत पोलिसांनी त्यांना अडविले तेव्हा त्यांनी मास्क न परिधान केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांच्याविरोधात संचारबंदीचा आदेशाचा भंग तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर एका दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कोर्टाने त्यांना दोषी ठरवून प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here