एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट निर्माण झालं आहे. पक्ष आणि सरकार वाचवण्याचं आव्हान ठाकरेंसमोर आहे.

हायलाइट्स:
- शिंदेंच्या बंडामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरुच
- सोबत ४६ आमदार असल्याचा शिंदेंचा दावा
- ठाकरेंसमोर पक्ष आणि सरकार वाचवण्याचं आव्हान
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतला रवाना झालेले बहुतांश आमदार ग्रामीण भागांमधील आहेत. अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत थेट संपर्क होऊ न शकल्यानं सेनेचे बरेचसे आमदार त्यांचे प्रश्न शिंदेंकडे मांडायचे. शिंदे या आमदारांसाठी कायम उपलब्ध असायचे. त्यामुळे शिंदेंबद्दल सॉफ्ट कॉर्नर असलेल्या आमदारांची संख्या वाढत गेली. सूरतला त्यांच्यासोबत गेलेल्यांमध्ये याच आमदारांचा समावेश आहे. मात्र आता मुंबईतील आमदारही शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले आहेत.
शिवसेनेचे एकूण सहा आमदार नॉट रिचेबल आहेत. पैकी तीन जण गुवाहाटीला पोहोचले आहेत. पोलीस सुरक्षेत हे आमदार हॉटेल रॅडिसन ब्ल्यूवर पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी शिंदे स्वत: हॉटेलच्या लॉबीत उभे होते. या आमदारांच्या कार्सच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या. त्यामुळे त्यांचे चेहरे दिसू शकले नाहीत. मात्र या तीन आमदारांपैकी दोन जण मुंबईचे असल्याची माहिती मिळत आहे. माहिमचे आमदार सदा सरवणकर आणि कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर अशी त्यांची नावं आहेत.
मुंबईतील आणखी एक आमदार नॉट रिचेबल आहेत. चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे सेनेच्या संपर्कात नाहीत. राज्यमंत्री दादा भुसेदेखील नॉट रिचेबल आहेत. विशेष म्हणजे शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला लांडे आणि भुसे उपस्थित होते. सावंतवाडीचे आमदार दिलीप केसरकर आणि यवतमाळच्या दिग्रसचे आमदार संजय राठोडदेखील नॉट रिचेबल होते. आपल्याला भाजपसोबत जावं लागेल, अशी भूमिका अनेक दिवसांपासून मी ठाकरे साहेबांकडे मांडतोय, असं केसरकर यांनी कालच माध्यमांनी सांगितलं होतं आणि आता ते नॉट रिचेबल झाले आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : maharashtra political crisis 6 six shiv sena mlas not reachable including 4 form mumbai and konkan
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network