एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट निर्माण झालं आहे. पक्ष आणि सरकार वाचवण्याचं आव्हान ठाकरेंसमोर आहे.

हायलाइट्स:
- शिंदेंच्या बंडामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरुच
- सोबत ४६ आमदार असल्याचा शिंदेंचा दावा
- ठाकरेंसमोर पक्ष आणि सरकार वाचवण्याचं आव्हान
शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. आज शिंदे समर्थक आमदारांची संख्या सातनं वाढली आहे. दीपक केसरकर, दादा भुसे, मंगेश कुडाळकर, आशिष जैस्वाल, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, संजय राठोड गुवाहाटीत पोहोचले आहेत. यातील जैस्वाल हे शिवसेनेच्या समर्थनानं निवडून आलेले आहेत. तर बाकीचे सहा आमदार सेनेचे आहेत. यानंतर आता शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचं कळतं.
आपला गट हाच शिवसेना विधिमंडळ पक्ष असल्याचा दावा शिंदेंकडून करण्यात येईल. त्याला मान्यता मिळाल्यास राज्यात नवं सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होईल. तसं झाल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे फारसे पर्याय उरणार नाहीत. काल संध्याकाळी पाच वाजता शिवसेनेचे प्रतोद असलेल्या सुनील प्रभू यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपस्थित न राहिल्यास कारवाईचा इशारादेखील देण्यात आला. या बैठकीला किती जण उपस्थित होते, याची कोणतीही माहिती सेनेकडून देण्यात आलेली नाही.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : maharashtra political crisis eknath shinde might write to assembly deputy speaker
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network