एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट निर्माण झालं आहे.

 

eknath shinde
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • शिंदेंच्या बंडामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरुच
  • सोबत ४६ आमदार असल्याचा शिंदेंचा दावा
  • ठाकरेंसमोर पक्ष आणि सरकार वाचवण्याचं आव्हान
मुंबई: शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माझ्यासोबत ४६ आमदार आहेत आणि आणखी १० आमदार येतील, असा दावा शिंदेंनी काल गुवाहाटीच्या विमानतळाबाहेर केला. यानंतर आज सेनेचे सहा आमदार गुवाहाटीला गेले आणि शिंदेंच्या गटात सामील झाले. आपल्यासोबत सेनेचे दोन तृतीयांश आमदार असल्यानं गटनेतेपदी अजय चौधरी यांची नेमणूक बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदेंनी केला. आता यावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदेंनी गटनेतेपदावर दावा करणारं पत्र पाठवलं. मात्र त्यावरील सहीवर आमदार नितीश देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे. मी इंग्रजीत सही करतो. मात्र पत्रावर माझ्या नावे करण्यात आलेली स्वाक्षरी मराठीत असल्याचा देशमुखांचा दावा आहे. त्यामुळे मला हे प्रकरण तपासावं लागेल, असं झिरवळ म्हणाले.
आता शिंदेंची कसोटी लागणार! आंबेडकरांनी सांगितला भाजपचा कुटिल ‘डाव’
बंड केल्यानंतर शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरून हटवलं आणि अजय चौधरी यांची नियुक्ती केली. यावर शिंदेंनी आक्षेप घेतला. दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आमच्याकडे आहे. त्यांना चौधरी यांची नियुक्ती मान्य नाही. त्यामुळे चौधरी यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदेंनी केला. शिंदे गटानं शिवसेनेचे विधिमंडळ मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे.
Sanjay Raut: तुम्ही पुन्हा निवडून येऊनच दाखवा; संजय राऊतांचं शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना ओपन चॅलेंज
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना नरहरी झिरवळ यांनी महत्त्वाचा नियम सांगितला. पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो आणि गटनेत्यानं प्रतोद नेमायचा, असं झिरवळ म्हणाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरू हटवलं आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक करण्यात आली. याबद्दलचं पत्र मला मिळालं आहे, असं झिरवळ यांनी सांगितलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra political crisis assembly deputy speaker reaction on shiv sena legislative group leader
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here