यावेळी त्यांना लग्न कुठे करणार, असं विचारलं असता हार्दिक म्हणाला,’आम्ही विराजस आणि शिवानीशी चर्चा केली. नुकतंच त्यांनी पुण्याला लग्न केलंय. आम्हीही पुण्यालाच लग्न करण्याचं ठरवत आहोत.’ हार्दिक आणि अक्षयाचा साखरपुडा कोल्हापूरला झाला होता. त्यामागे काही खास कारण होतं.
हार्दिक म्हणाला, ‘तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे आम्ही भेटले. नंतर घराघरात पोहोचलो. या मालिकेच्या पार्श्वभूमीला कोल्हापूर होतं. तिथंच सगळं कथानक घडतं. म्हणून आम्ही तिथं साखरपुडा केला.’
हार्दिक जोशीला अक्षयाबद्दल विचारलं असता तो म्हणाली, ‘आम्ही अगोदर खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे अक्षया कुठे कशी प्रतिक्रिया देईल, हे मला चांगलं ठाऊक असतं. आम्ही एकमेकांना अगदी जवळून ओळखतो.’
लग्नानंतर अक्षयानं एक गोष्ट बदलावी, असं हार्दिकचं म्हणणं आहे. ती म्हणजे संतापावर ताबा मिळवला पाहिजे. ‘अक्षया लगेच संतापते. तिला पटकन राग येतो. लग्नानंतर तिनं यात बदल करायला हवा.’ पाठकबाईंबद्दल राणादांचं म्हणणं आहे.
३ मे रोजी दोघांचा साखरपुडा झाला. अक्षया-हार्दिक यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या सेटवरच. मालिका सुरू झाली तेव्हा दोघांच्या खासगी आयुष्याबद्दलही बोललं गेलं. अक्षयाच्या आयुष्यात तेव्हा हार्दिक नव्हता. एका अभिनेत्यासोबत ती नात्यात होती. परंतु काही कारणांमुळं दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अक्षयाच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. पण तेव्हाच दोघांचा जीव एकमेकांत रंगायला लागला होता.