अमरावती : एका १७ वर्षीय मुलाने तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केला. यातूनच पीडितेला गर्भधारणा झाली. हा धक्कादायक प्रकार राजा पेठ ठाण्याच्या हद्दीत नुकताच समोर आला आहे. या प्रकरणी राजा पेठ पोलिसांनी १७ वर्षीय मुला विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

शहरात राहणाऱ्या पीडित तेरा वर्षीय मुलीला तिच्या पालकांनी रुग्णालयात आणले होते. यावेळी मुलीला सुमारे १९ आठवड्यांची गर्भधारणा झाली असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यावेळी उपचार करण्यासोबतच डॉक्टरांनी तत्काळ ही माहिती राजा पेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी रुग्णालय गाठले व मुलीला विचारपूस केली. मात्र, मला गर्भधारणा कशी झाली, हे मलाच माहित नाही, असे वारंवार मुलगी पोलिसांना सांगत होती.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदाराचा मोठा खुलासा, फोनवरून सांगितली ‘INSIDE STORY’

यामुळे पोलिसांसमोर ही सुरूवातीला पेच निर्माण झाला होता. त्यामुळेच राजा पेठ पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलिसांनी दीड दिवस सखोल तपास केला असता मुलीच्या परिचित एका सतरा १७ वर्षीय मुलगा होता. त्यानेच या मुलीवर अत्याचार केल्याचे पुढे आले व तपासात पीडित मुलीने सुद्धा तसे सांगितले, अशी माहिती राजा पेठ पोलिसांनी दिली. गुन्हा दाखल झाल्यामुळे हा १७ वर्षीय मुलगा पसार झाला आहे.

‘शरद पवार आणि काँग्रेस नको म्हणून ५० आमदारांनी मूळ घर सोडलं’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here