मुंबई: प्रिया बापट ही मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. एक गुणी अभिनेत्री म्हणूनही तिची ओळख आहे. आपल्या अभिनयाबरोबरच प्रिया बापट तिच्या हटके अशा फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते. प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियातून ती चाहत्यांशी संवादही साधत असते. तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती देखील ती चाहत्यांना सोशल मीडियावर पोस्ट करून देत असते. पण मराठी प्रेक्षक सध्या प्रियावर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे.
ताई तुझ्यासोबत काम करणं…प्राजक्ता माळीची मुक्ता बर्वेसाठी खास पोस्टप्रियाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. पण प्रिया मराठी चित्रपटांमध्ये दिसत नसल्यानं चाहत्यांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू आहे. तिला मराठी चित्रपट करायचे नाहीत, असंही म्हटलं जात आहे. मराठी चित्रपटात काम करण्यास उत्सुक नसल्याच्या चर्चेवर आता खुद्द प्रियानंच मौन सोडलं आहे.
त्या विषयावर पहिल्यांदाच बोलली प्राजक्ता माळी, म्हणाली ब्रेकअपमुळं मी…
मला मराठी चित्रपट करायचे नाहीत असं म्हटलं जात आहे, पण हे खरं नाही, हा एक माझ्याविषयीचा गैरसमज निर्माण झालाय, असं प्रियानं म्हटलं आहे.


प्रियानं २०१८ मध्ये ‘आम्ही दोघी’ हा चित्रपट केला. त्यानंतर ती मराठी चित्रपटांत दिसली नाही. मला मराठी चित्रपट करायचा नाही, असा गैरसमज सध्या पसरला आहे, असं प्रिया सांगते. ती म्हणाली, ‘मला चांगल्या भूमिका करायच्या आहेत. खरं तर या चित्रपटानंतर मराठीत मला चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे चांगल्या भूमिकेची वाट पाहत आहे.’ असंही प्रियानं स्पष्ट केलं आहे.


विस्फोट
प्रिया लवकरच ‘विस्फोट’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियासोबत फरदीन खान रितेश देशमुख असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here