Shivsena MLA’s with Eknath Shinde | शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वाढता प्रतिसाद मिळताना दिसत आहे. माझ्यासोबत ४६ आमदार आहेत आणि आणखी १० आमदार येतील, असा दावा शिंदेंनी काल गुवाहाटीच्या विमानतळाबाहेर केला. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील हे नेते शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का बसला. आता सेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. त्यातील काही जण गुवाहाटीला गेल्याची माहिती समोर येत आहे.

 

Sanjay Raut angry (3)
संजय राऊत, शिवसेना

हायलाइट्स:

  • गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये कोणीही कितीही खाताना-पितानाचे फोटो टाकू देत
  • पण हे २१ आणि मुंबईत परतलेले २ असे २३ आमदार हे शिवसेनेसोबतच आहेत
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये असणारे २१ आमदार आमच्या संपर्कात आहे. त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी व्यवस्थित चर्चा झाली आहे. मुंबईत आल्यानंतर हे सर्व आमदार शिवसेनेसोबत येतील, असा महत्त्वपूर्ण दावा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये कोणीही कितीही खाताना-पितानाचे फोटो टाकू देत. पण हे २१ आणि मुंबईत परतलेले २ असे २३ आमदार हे शिवसेनेसोबतच आहेत. उद्या विधानसभेत बहुमताची परीक्षा झाल्यास त्याठिकाणी आम्ही त्याठिकाणी बहुमत सिद्ध करू, असेही संजय राऊत यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

जे आमदार या क्षणी महाराष्ट्राच्याबाहेर आहेत, या सर्व आमदारांची इच्छा असेल तर महाविकासआघाडीतून शिवसेनेने बाहेर पडले पाहिजे आणि वेगळा विचार केला पाहिजे, त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल. पण त्यांनी मुंबईत येऊन ही मागणी मांडावी. महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही २४ तासांत परत या. तुमच्या मागणीचा उद्धव ठाकरे विचार करतील. हे मी जबाबदारीने सांगत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे. कारण संजय राऊत यांचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्ही शेवटपर्यंत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहू, अशी भाषा केली जात आहे. मात्र, त्याचवेळी आता शिवसेना मात्र महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दर्शवित असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : eknath shinde camp 21 mla’s are in touch with shivsena claim by shivsena leader sanjay raut
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here