शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे मागील तीन दिवसापासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कट्टर शिवसैनिक देखील आता बंडामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे शिवसेनेला क्षणोक्षणी हादरे बसत आहेत.
तर भाजपाने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना ८ कॅबिनेट मंत्री, ५ राज्यमंत्री पद आणि केंद्रामध्ये २ मंत्रिपद देण्याची ऑफर भाजपाने दिली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला वरील आपला मुक्काम मातोश्रीकडे हलवला आहे. अशातच भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
काय आहे ट्विट?
‘आपली खरी धोरणं सोडून अनैतिक धोरणांचा सहारा घेतल्यानंतर काय परिमाण होतात, त्याची रंगीत तालीम तुम्हाला तुमच्या आमदारांनी करून दाखवली. उद्धव साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना होत नाही त्यासाठी मने जिंकावी लागतात, ती बाळासाहेबांनी जिंकली होती’ या आशयाचे ट्विट भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली आहे.