जम्मू, भद्रवाहः करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित केला गेला. त्याचवेळी पुण्यातील चित्रपट निर्माते नचिकेत गुट्टीकर सामानाची बांधाबांध करून महाराष्ट्राकडे निघत होते. पण लॉकडाऊनमुळे ते अडकून पडले.

चित्रपट निर्माते नचिकेत गुट्टीकर हे आपले सहकारी शमिन कुलकर्णी आणि निनाद दातारसह एका लघुपटाच्या शूटिंग करण्यासाठी १५ मार्चला भद्रवाहमध्ये आले होते. यानंतर २५ मार्चला ते जम्मूहून विमानाने पुण्याला येणार होते. पण २४ मार्चला देशात लॉकडाऊन घोषित झाल्याने त्यांना तीन आठवडे तिथेच राहणं भाग होतं.

सरकारने २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्याने आम्ही घाबरलो पडलो. हॉटेल्स, लॉजसह विमान, रेल्वे आणि बस वाहतूक बंद झाल्याने काय कारवं हे आम्हाला सुचेनासं झालं, असं गुट्टीकर यांनी सांगितलं. अशावेळी गाथा गावातील एक मुस्लिम कुटुंब आमच्या मदतीसाठी धावलं. त्यांनी त्यांच्या घरात राहण्यासाठी आम्हाला जागा दिली. गेल्या काही आठवड्यापासून इथं राहतोय. आम्ही आपल्या घरीच राहतोय असं आम्हाला आता वाटू लागलंय. कश्मीरियत बद्दल आम्ही खूप ऐकलं होतं. आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला येत आहे, असं गुट्टीकर यांनी सांगितलं.

संकट काळात अडकलेल्या गुट्टीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली. आम्हाला आनंदच आहे. याच जागी आमची मुलं अडकली असती तर त्यांना नक्कीच कुणीतरी मदत केली असती, असं नझीम मलिक यांनी सांगितलं. एवढचं नव्हे तर जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत आम्ही त्यांची सेवा करू, असं मलिक यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here