मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेनं महाविकास आघाडीमधून बाहेर पडून भाजपसोबत युती करून नवं सरकार स्थापन करावं, असा प्रस्ताव देऊन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला पेचात टाकले आहे. त्याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी यावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अभिनेता सुमीत राघवन यानं देखील एक ट्विट करत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे. हा निर्णय घ्यायला शिंदे यांना अडीच वर्ष का लागलं? असा प्रश्नही सुमीतनं उपस्थित केला आहे.
‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं..’, एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर अभिनेत्याचा सल्ला
राज्यातील राजकीय परिस्थिती पाहून अभिनेताही म्हणाला- ‘सेल… सेल… सेल… एमएलए ले लो’
काय आहे सुमीतचं ट्विट?
एक साधा प्रश्न. माझ्या सारख्या सामान्य मुंबईकराला जेव्हा कळत होतं की जे झालं ते योग्य नव्हतं (म. वि. आ) तर मग एकनाथ साहेब,तुमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकाला,जो बाळासाहेबांच्या आणि खासकरून दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाला आहे,अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला? असा थेट प्रश्न सुमीतनं त्याच्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

ट्विट

आरोह वेलणकरचं ट्विटही चर्चेत
एकनाथ शिंदे मंगळवारी बराच काळासाठी नॉट रिचेबल होते. त्यानंतर त्यांनी एक ट्वीट करून त्यांची भूमिका पुसटशी मांडली होती. त्यांनी असं ट्वीट केलं होतं की, ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही’. त्यामुळे नेमकी त्यांनी काय भूमिका घेतली आहे हे स्पष्ट झाले नव्हते. आरोहनं एकनाथ शिंदेंच ट्विट री-ट्विट करत लिहिलं होतं की, ‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं’. आरोहच्या या ट्वीटवर सोशल मीडियावर विविध कमेंट्स येत आहेत. काहींनी आरोहवरच टीका केली असून काही नेटकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here