रत्नागिरी : कोकण रेल्वेचे विद्युतीकरण करण्यात आल्याने तिचा वेग आता वाढला आहे. त्यानंतर आता सर्व मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकिट मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही रिझर्वेशन शिवाय ऐनवेळी तिकीट काढूनही प्रवास करू शकणार आहात. प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे आता वेटिंग लिस्ट असलेल्या आणि ऐनवेळी प्रवासाचं नियोजन करणाऱ्या प्रवाशांनासाठी हा मोठा दिलासा मिळाल्याने प्रवास आता अधिक सोपा होणार आहे.