मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभा आणि विधानपरिषद आमदार आणि राज्यसभा आणि लोकसभा खासदारांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ‘या बंडाच्या मागे भाजप असल्याचं अजून दिसून आलं नाही. या बंडाच्या मागे भाजपचा कोणता मोठा असल्याचं दिसून आलं नाही, असं म्हणत उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी क्लीन चीट दिली. तर दुसरीकडे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये भाजपचा आपल्याला पाठिंबा असल्याचं ते म्हणत आहेत. कुठेही काही लागलं तर कमी पडणार नाही, असा शब्द भाजपने आपल्याला दिल्याचं एकनाथ शिंदे सांगत आहेत.

‘माध्यमांऐवजी समोर सांगितलं असतं तर हे गैरसमज दूर झाले असते. राष्ट्रवादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत पाठिंबा देणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सरकार टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. निधीबाबत कोणतात दुजाभाव केला नाही. निधीवरून माझ्यावर आरोप होत आहे. अडीच वर्षात निधीला कुठेच काटछाट केली नाही. असंही ते यावेळी म्हणाले. राज्यातील परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत. सरकार टिकवण्याची जबाबदारी ही तिन्ही पक्षांची आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

भाजपचा आपल्याला पाठिंबा, कुठलीही मदत लागली तरी मदतीचा शब्द, एकनाथ शिंदेंकडून मोठा गौप्यस्फोट
‘आपण फक्त एकजुटीने राहू. विजय आपलाच आहे, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी त्यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. भाजप एक राष्ट्रीय शक्ती आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने बलवान आहे. आपल्याला मदतीचा त्यांनी शब्द दिलाय. तुमच्या पाठीमागे आमची पूर्ण शक्ती असल्याचं भाजप नेतृत्वाने आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे आता आणण एकजूट राहण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना मार्गदर्शन करत म्हणाले.

‘मी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. आदित्य ठाकरे यांच्याशी देखील बोललो आहे, असं अजित पवार म्हणाले. आमची यापेक्षा कसलीही वेगळी भूमिका नाही, असं अजित पवार म्हणाले. शिवसेना नेते प्रवक्ते याविषयी सांगतील. सेनेचे कैलास पाटील, नितीन देशमुख असतील ते परत आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांना आवाहन केलं आहे. महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलेला आहे. आमचे सर्व आमदार आमच्या भूमिकेशी सहमत आहेत’, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

अजितदादा म्हणतात, उद्धव ठाकरेंना विचारेन, तुमच्या मनात दुसरं काही आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here