एअर इंडियाने ४ मेपासूनच्या काही देशांतर्गत विमानांच्या उड्डाणांचे बुकींग सुरू केले होते. तसंच १ जूनपासूनच्या आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांसाठीही बुकींग सुरू करण्यात आले होते. यानंतर नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय.
इंडिगोनेही केली होती घोषणा
४ मे पासून टप्प्या-टप्प्याने विमानांची उड्डाणं सुरू करण्यात येतील, असं काही दिवसांपूर्वी इंडिगोनेही म्हटलं होतं. वाढवण्यात आलेला लॉकडाऊन ३ मे रोजी संपण्याच्या शक्यतेतून कंपनीने ही घोषणा केली होती.
रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे मिळणार
लॉकडाऊनदरम्यान बुकिंग केलेल्या तिकिटांचे पैसे रिफंड होतील किंवा रोख देण्यात येणार आहेत. तुम्ही २५ मार्च आणि ३ मेदरम्यानचे तिकीट बुक केले असेल तर त्याचा रिफंड क्रेडिट केला जाईल किंवा तुम्हाला रि-शेड्युल करता येईल, असं सांगण्यात आलं होतं. नंतर २५ मार्च ते १४ एप्रिल दरम्यानच्या बुकिंगचे कॅश रिफंड करण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times