धुळे जिल्ह्यात अवैद्य सावकारी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. पोलिसांनी आता अवैद्य सावकारी विरोधात चांगलीच कंबर कसली असताना आज पुन्हा राजेंद्र बंब याचा भाऊ संजय बंब याच्या लॉकरवर धाड टाकून लाखो रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. यामध्ये ७७ लाख ९३ हजार रुपये रोख रक्कम, १४९ ग्रॅम सोने ज्याची किंमत ७ लाख ५१ हजार रुपये, राजेंद्र बंब याने कर्जदारांकडून घेतलेल्या सौदा पावत्या, ४९० पेक्षा जास्त कोरे चेक, २४४ पेक्षा जास्त कोरे स्टॅम्प पेपर आणि २६० बेनामी मुदतीच्या पावत्या असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांचे आवाहन…
दरम्यान, राजेंद्र बंब याने कोणाला कर्जदाराच्या मालमत्तेचे कागदपत्र गहाण तथा सौदा पावती करून घेतले असल्यास त्यांनी धुळे आर्थिक गुन्हे शाखेचे संपर्क करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.