उसतोडणी मुकादम कृष्णा पवार (रा.भोगलगाव) यांनी उसतोड मजूर शिवाजी पवार यांना उसतोडणीसाठी दीड लाख रूपये दिले होते. परंतु काही अडचणीमुळे त्यांचे उसतोडणीला जाण्याचे रद्द झाले. उसतोडणीला येणं का रद्द केले असं म्हणत मुकादमाने मुद्दाम उसतोड कामगाराकडे दोन लाखाची मागणी करून बेदम मारहाण केली असून पत्नी सविता शिवाजी पवार यांना देखील काही महिलांनी धरून विष पाजून मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले मात्र, त्या ठिकानी सर्जनअभावी पुढील उपचारासाठी डॉ. चोरडीया यांनी सदरील महिलेला जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मारहाणीमुळे या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याप्रकरणी तलवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची आत्ताच आम्हाला माहिती मिळाली असून पुढील तपास आम्ही करत आहोत आणि गुन्हा नोंद घेण्याची प्रक्रिया देखील चालू असल्याचं तलवाडा पोलिसांनी सांगितलं आहे. अशाप्रकारे मारहाण आणि महिलेला वीष पाजून मारहाण केल्याची घटना ही पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये घडली आहे. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊसतोड कामगारांमधून मुकदमवर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.