गुवाहाटी: शिवसेनेविरोधात बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या गुवाहाटीच्या हॉटेल रॅडिसनमध्ये आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरुवातीला सूरत आणि नंतर थेट गुवाहाटीत दाखल झाल्याने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी साधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आपल्या गटाच्या आमदारांना सुरक्षितस्थळी ठेवण्याचा उद्देश बऱ्याच अंशी यशस्वी होताना दिसत होता. परंतु, शुक्रवारी साताऱ्यातील काही शिवसैनिक गुवाहाटीत जाऊन पोहोचले. या शिवसैनिकांपैकी संजय भोसले (Sanjay Bhosale) यांनी हॉटेल रॅडिसनबाहेर जोरदार घोषणबाजी केली. यावेळी आसाम पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई होतात, ते पाहावे लागेल.

यावेळी संजय भोसले यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत परतरण्याचे आवाहन केले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत यावे, हे सांगायला मी इकडे आलो आहे. केंद्र सरकारने कितीही दडपण असले तरी शिंदे यांनी शिवसेनेची साथ सोडू नये. मी बाळासाहेबांचा आणि उद्धवसाहेबांचा शिवसैनिक आहे, असे संजय भोसले यांनी सांगितले. संजय भोसले हे शिवसेनेचे सातारा उपजिल्हा प्रमुख आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे साताऱ्यातील काही कार्यकर्तेही होते. त्यामुळे आता या सगळ्यांप्रमाणेच शिवसेनेचे आणखी काही कार्यकर्ते गुवाहाटीत धडकणार का, हे पाहावे लागेल. तेव्हा एकनाथ शिंदे आपल्या गटाच्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करणार, हे पाहावे लागेल.
सरकार टिकेल किंवा जाईल, पण पवारांबाबत अशी भाषा मान्य नाही; राऊतांनी भाजपला सुनावले

रॅडिसन हॉटेलवर तृणमूल काँग्रेसचा हल्लाबोल

एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा मुक्काम असलेल्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलवर गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला होता. गुरुवारी सकाळी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक या हॉटेलच्या परिसरात धडकले. त्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रॅडिसन हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला.

भाजपने महाराष्ट्रातील राजकारण आसाममध्ये खेळू नये. भाजपने शिवसेनेच्या आमदारांची खरेदी-विक्री करण्यासाठी त्यांना याठिकाणी आणून ठेवले आहे. आसामच्या अनेक भागांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, केंद्रातील भाजप सरकारने पूर पीडितांना एकाही पैशाचीही मदत केलेली नाही. त्याऐवजी भाजपने महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांना आसाममध्ये आणून घोडेबाजार सुरु केला आहे, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here