Maharashtra political crisis | राज्यात काय चाललंय त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. अधुनमधून मी टीव्ही पाहतो, यापलीकडे राजकीय घडामोडींबद्दल मला फार माहिती नाही. देवेंद्र फडणवीस हेदेखील नेहमीप्रमाणे दिल्लीला गेले होते. दिल्लीत कार्यकर्त्यांची काही कामं असतात, केंद्रीय नेत्यांशी चर्चा करायची असते. काल देवेंद्र फडणवीस आणि मी मुंबईत जेवणासाठी एकत्र भेटलो होतो. त्यावेळी आमच्यात सविस्तर चर्चा झाली.
हायलाइट्स:
- देवेंद्र फडणवीस हेदेखील नेहमीप्रमाणे दिल्लीला गेले होते
- दिल्लीत कार्यकर्त्यांची काही कामं असतात
- मी माझं रुटीन कामच करत आहे
मी काल मुंबईतील कार्यक्रमात होतो. आज आई आजारी आहे म्हणून कोल्हापूरला आलोय, उद्या पुण्यातील कार्यक्रमासाठी जाणार आहे, त्यानंतर शिर्डीला जाईन. त्यामुळे मी माझं रुटीन कामच करत आहे. राज्यात काय चाललंय त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे. अधुनमधून मी टीव्ही पाहतो, यापलीकडे राजकीय घडामोडींबद्दल मला फार माहिती नाही. देवेंद्र फडणवीस हेदेखील नेहमीप्रमाणे दिल्लीला गेले होते. दिल्लीत कार्यकर्त्यांची काही कामं असतात, केंद्रीय नेत्यांशी चर्चा करायची असते. काल देवेंद्र फडणवीस आणि मी मुंबईत जेवणासाठी एकत्र भेटलो होतो. त्यावेळी आमच्यात सविस्तर चर्चा झाली. जर राज्यातील घडामोडींमध्ये भाजपचा संबंध असता आणि इतकेच महत्त्वाचे असते तर देवेंद्र फडणवीसांनी मला मुंबईतच थांबवून घेतले असते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
‘संजय राऊत आणि शरद पवारांना इतरांपेक्षा जास्तीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’
महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींशी भाजपचा कोणताही संबंध नाही. मात्र, शरद पवार आणि संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोप करत आहेत. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण शरद पवार आणि संजय राऊत यांना जरा जास्तीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मला शरद पवार किंवा नारायण राणे नेमकं काय म्हणाले, हे माहिती नाही. पण भाजपची अधिकृत भूमिका अध्यक्ष म्हणून मीच मांडतो. पण इतर नेत्यांनाही उत्तर देण्याचे अधिकार आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : bjp chandrakant patil on shivsena eknath shinde revolt and maharashtra political crisis
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network