मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघंही अगदी स्टाइलिश लूकमध्ये दिसत होते. दोघंही अगदी रोमँटिक ठिकाणी निघाले आहेत. ते पॅरिससाठी रवाना झाले. पण पूर्ण माहिती अजून कळली नाही.
‘भाजपचा निवडणुका जिंकण्यावर नाही तर सरकार पाडण्यावर विश्वास’
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
मलायका आणि अर्जुनचा हा विमानतळावरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकरी कमेंट करत आहेत. एकानं लिहिलं आहे, ‘सगळ्यांनाच खूश राहण्याचा हक्क आहे. ते एकत्र आनंदी आहेत, तर ती त्यांची निवड आहे. दोघं एकत्र आनंदात राहतात, हेच महत्त्वाचं आहे.’ तर दुसऱ्यानं मात्र तो प्रश्न विचारलाच, ‘लग्न कधी आहे?’
तीन वर्षांपूर्वी रिलेशनशिप केलं अधिकृत
तीन वर्षांपूर्वी त्यांनी सगळ्यांना आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. इन्स्टाग्रामवर दोघांनी एकत्र फोटो शेअर केला होता. जगासमोर एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं होतं. दोघं लग्नाचा विचारही करत आहेत. पण अजून नक्की तारीख ठरलेली नाही. एका मुलाखतीत मलायका म्हणाली होती, आता ते अशा एका वळणावर उभे आहेत, की पुढे काय करायचं ते ठरवायची वेळ आली आहे.

अर्जुन कपूरचे येणारे सिनेमे
अर्जुन कपूर २६ जूनला आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानं इश्कजादे सिनेमातून बाॅलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. फिल्म इंडस्ट्रीत त्याला १० वर्ष पूर्ण झाली. लवकरच तो एक व्हिलन रिटर्न्स सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी होईल. Kuttey आणि द लेडी किलर असे सिनेमेही तो करणार आहे.
लाल बॅकलेस गाऊनमधले जान्हवी कपूरचे Photo पाहिलेत का? चाहत्यांची उडाली झोप
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’