अभिनेता सुमीर राघवन, आरोह वेलणकर, हेमंत ठोमे यांच्या ट्विटची प्रचंड चर्चा झाली. यानंतर आता अभिनेत्री हेमांगी कवी हिनं देखील एक पोस्ट केली आहे. ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?, असं हेमांगीनं म्हटलं आहे.
हेमांगीच्या या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘या महाराष्ट्रात वाघ फक्त दोनच होऊन गेले, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज’, असं एकानं म्हटलं आहे. तर ‘बाई. . . अशा कॉमेंट वरुन केतकी चितळे व्हाल. सावधान’, असं एका युझरनं म्हटलं आहे.
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी देखील या सर्व घडामोंडीवर एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख शिवसेनेचा वाघ म्हणून केला होता.
काय म्हणाल्या होत्या दीपाली सय्यद?
‘माननीय एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांनी भाजपची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या आयटी सेलच्या लिंबु टिंबुनी सोशल मिडीयावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही’, असं दीपिला सय्यद म्हणाल्या होत्या.