शिवसेना समर्थक देखील शिंदेंच्या विरोधात नाराजी व्यक्त करीत असून सोशल मीडियात तशा पोस्ट व्हायरल होत आहेत. अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांचे पुतळे दहन, पुतळ्याला जोडे मारो आंदोलन देखील केले जात आहे. धरणगाव येथे देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला होता. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी गुरुवारी सोशल मीडियाद्वारे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक पोस्ट शेअर केली होती. ‘शिवसेना बाळासाहेबांचीच असून डुप्लिकेटांची नाही’, असे त्यात त्यांनी म्हटले होते.
जळगावातील अनेक शिवसेना पदाधिकारी आणि समर्थकांनी ही पोस्ट आपल्या फेसबुक, व्हाट्सअँप स्टेटसवर ठेवली होती. जळगावात शुक्रवारी याच आशयाचे पोस्टर झळकले असून महात्मा गांधी मार्गावर दुभाजकांवर जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याकडून हे पोस्टर लावण्यात आले आहे. एकंदरीत शिवसेना कुणाची हा मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी असंख्य आमदारांना घेऊन शिवसेनेसोबत बंड केल्याने शिवसैनिकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. तर अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी मधून उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चक्क स्वतः रक्ताने उद्धव ठाकरे तसेच एकनाथ शिंदे या दोघांना पत्र लिहलं आहे. या पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांना आम्ही तुमच्यासोबत असल्याचं तर एकनाथ शिंदे यांना पुन्हा परत येण्याचा भावनिक साद घालण्यात आली आहे.
राजकीय बंडाळीवरून संभाजीराजे छत्रपतींनी राज्यकर्त्यांना थेट सुनावलं, पाहा काय बोलले…