जळगाव : जिल्ह्यात काल गुरुवारी (दि. २३) सायंकाळी अनेक तालुक्यांमध्ये वादळासह पावसाने हजेरी लावली. याचदरम्यान, वादळी पावसात वीज कोसळल्याच्या तीन घटना घडल्या. या तिघंही घटनांमध्ये दोन शेतात काम करणाऱ्या तीन महिलांसह सरपण आणण्यास गेलेल्या तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. जामनेर, यावल व रावेर तालुक्यात या दुर्दैवी घटना घडल्या आहेत.

निंदणीचे काम करणाऱ्या विवाहीतेचा मृत्यू

यावल तालुक्यातील नावरे गावातील रीना सुनील मेढे (३९) या त्यांच्या सासुच्या विरावली शिवारातील शेतात निंदणीचे काम करत होत्या. गुरुवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी रीना सुनील मेढे यांनी एका वृक्षाचा आधार घेतला. त्याचवेळी वृक्षावर वीज कोसळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच महिलेला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

“उद्या राष्ट्रवादी आमचे मतदार संघ हाणतया” गुवाहाटीत असलेल्या शहाजीबापूचा कॉल व्हायरल

वृक्षाखाली थांबलेली महिला ठार

जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथिल हुजराबाई नब्बास तडवी (४०) या तोंडापूर शिवारातील शेतात काम करीत होत्या. अचानक पावसाला सुरुवात झाल्याने हुजुराबाई तसेच तेथिल शेतकरी सुपडू जाधव पावसापासून बचावासाठी एका वृक्षाखाली थांबले. मात्र, तेथे वीज पडून हुजराबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुपडू जाधव गंभीर जखमी झाले.

सरपण घेण्यासाठी गेलेला तरुण ठार

रावेर तालुक्यातील जानोरी येथील मुकद्दर कलिंदर तडवी (२१) हा तरुण सरपण गोळा करण्यासाठी शेत शिवारात गेला होता. तेथे अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वृक्षाच्या आश्रयाला मुक्कदरच्या अंगावर अचानक वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला. मुक्कदर कुटुंबातील एकूलता एक असल्याने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. घटना समजताच सरपंच गंभीर तडवी व शेतकऱ्यांनी यांनी त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला.

पावसाबाबत महाराष्ट्रासाठी महत्त्वाची अपडेट, हवामान विभागाने काय म्हटले? पाहा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here