मुंबई: राज्यात शनिवारी ३२८ नवे करोनाबाधीत रुग्ण सापडल्याने राज्यातील करोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. तर काल दिवसभरात ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एकूण ३०७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांमध्ये मुंबईत सर्वाधिक २२६८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. जाणून घेऊयात राज्यातील करोनाबाधितांची बित्तंबातमी…

>> मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा २२६८वर

>> मुंबईतील करोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा १२६वर

>> राज्यात सध्या ३४४ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. शनिवारी एकूण ५९९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २३ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

>> पालघर जिल्ह्यात ९७ करोना रुग्ण; वसईत ५ बळी

>> जळगावात करोनाचा तिसरा रुग्ण; महिलेला लागण

>> नगर: मृत व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह

>> नाशिक जिल्ह्यात शनिवारी २१ नवे रुग्ण सापडले

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here