maharashtra political crisis: एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी शिवसेनेनं हालचाली सुरू केल्या आहेत. शिंदे यांना गट स्थापन करत येऊ नये यासाठी शिवसेना पावलं उचलत आहे. १६ आमदारांना आजपासून नोटिसा जातील. त्यांना ४८ तासांत बाजू मांडावी लागेल.

 

notice of disqualification to 16 shivsena mla
शिवसेनेचे बंडखोर आमदार

हायलाइट्स:

  • १६ आमदारांना अपात्र ठरवा; सेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी
  • आमदारांना आजपासून नोटिसा बजावण्यात येणार
  • आपली बाजू मांडण्यासाठी आमदारांकडे ४८ तासांचा अवधी
मुंबई: शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं अशा आशयाची मागणी शिवसेनेकडून उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. या १६ आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. या आमदारांनी त्यांचं मत न मांडल्यास त्यांना अपात्र ठरववलं जाईल, असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले. आता बंडखोरांना शिवसेनेचं कवच सोडावं लागेल. आजपासून सर्वांना नोटिसा जातील. त्यांना बाजू मांडण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ आहे. त्यांना नोटिशीला उत्तर द्यावं लागेल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेनं १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यावर चार तास चर्चा झाली. अखेर रात्री सव्वा आठच्या सुमारास महाधिवक्ता विधान भवनात दाखल झाले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि इतर नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी नोटीस काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बंडखोर आमदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना २ दिवसांचा अवधी मिळेल. त्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.
मुख्यमंत्री होणार असाल तर खुशाल जा, बोलला असता तर उपमुख्यमंत्री केलं असतं: उद्धव ठाकरे
बंडखोरी आमदारांना पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. या आमदारांचा एक वेगळा गट होऊ शकत नाही. त्यांना भाजपमध्ये विलिनीकरण करावं लागेल. आम्ही कट्टर शिवसैनिक असल्याची डायलॉगबाजी बंडखोर मंडळी करत आहेत. विलिनीकरणानंतर ती डायलॉगबाजी बंद होईल, असा टोला सावंत यांनी लगावला.
बंडखोरांनो तुम्हाला भाजपसोबत जावं लागेल, नीलम गोऱ्हे बोलल्या तीच भीती मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त
शिवसेना सोडून काही जण दूर जाऊन लपले आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंनी त्यागाच्या भावनेतून वर्षा निवासस्थान सोडलं आहे. मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांसाठी दरवाजे बंद केले आहेत. आता त्या बंडखोरांना शिवसेनेचा भगवा सोडून कमळाबाईची सोबत करावी लागेल. आता त्यांना गट निर्माण करता येणार नाही. दुसऱ्या पक्षात जावं लागेल. येत्या ४ दिवसांत कायदेशीर कारवाई होईल, असं सावंत यांनी सांगितलं.

या एका कायद्यातून वाचले तर शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना शिंदेंना पाठिंबा द्यावा लागेल

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra political crisis notice of disqualification to 16 shivsena mla of eknath shinde camp
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here