औरंगाबाद: करोनाबाधित महिलेने जन्म दिलेल्या चिमुकलीला करोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झाले आहे. या बाळाच्या गर्भजल व व्हजायनल स्त्रावाच्या चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे मातेचा संसर्ग चिमुकलीला झाला नाही, हेदेखील स्पष्ट झाले आहे. दरम्यान, एकूण साथ करोनाबाधित रुग्ण करोनामुक्तीच्या मार्गावर असून या सात रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्याची शक्यता आहे.

मुंबईहून औरंगाबादेत आलेल्या या महिलेला करोनाची लागण झाल्याचं काही दिवसांपूर्वी उघडकीस आलं होतं. महिला नऊ महिन्यांची गर्भवती होती. तिला मधुमेह व हायपोथायरॉइडीझम हा आजार आहे. त्यामुळं तिची प्रसुती करण्याचं आव्हान घाटी रुग्णालयातील डॉक्टरांसमोर होतं. तिला भूल देणंही अवघड होतं. हे आव्हान जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ व भूल तज्ञांनी यशस्वीरित्या पेलले. संबंधित महिलेच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते; परंतु सिझेरियन प्रसूती करण्याशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर महिलेच्या पतीच्या परवानगीनुसार प्रसूती करण्यात आली असता तिने एका गोंडस बाळाल जन्म दिला होता. मात्र, तिच्या बाळाच्या करोनाची टेस्ट करण्यासाठी प्रसूतीनंतर बाळाचे रक्ताचे नमुने तसेच गर्भजल व व्हजायनल स्वॅब घेण्यात आला. त्याचे रिपोर्ट आज आले असून या बाळाला करोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून या बाळाला मातेपासून दूर ठेवण्यात आलं आहे. तसेच करोनाबाधित महिलेवर उपचार सुरू करण्यात आलं असून तिची प्रकृती ठिक असल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here