रत्नागिरी: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम दाखल झालेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर योगेश कदम व एकनाथ शिंदे समर्थकांची बैठक आमदार योगेश कदम यांच्या समर्थनार्थ शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक घेऊन योगेश कदम यांना समर्थन जाहीर केले आहे.

दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी ‘मी काल, आज, उद्या शिवसेनेतच..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही.. मुळात तशी गरजही पडणार नाही… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल… ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईन. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका.. मी शिवसैनिक! असे ट्विट आमदार योगेश कदम यांनी केले आहे. भाजपमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा गटही सद्यस्थितीत शिवसेनेचाच असल्याने आमदार योगेश कदम आपण शिवसेना सोडणार नाही हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदे आगे बढो..योगेश कदम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत एकनाथ शिंदे व योगेश कदम यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आम्ही आमदार योगेश कदम यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. दापोली मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकी दरम्यान सूर्यकांत दळवी गटाच्या नियुक्त्या पालकमंत्री अनील परब यांच्याकडुन करण्यात आल्या होत्या व त्यावेळी आमदार योगेश कदम यांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवत राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली होती. दापोली तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख व दापोली शहरप्रमुख या तीन पदांच्या नियुक्त्या पालकमंत्री अनिल परब यांनी जाहीर केल्या होत्या. रामदास कदम यांना थेट शह देण्यासाठी आमदार योगेश कदम यांना डावलण्यात आले होते.

अलीकडेच राबवण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानाची जबाबदारी आमदार योगेश कदम यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र हे परब यांनी नियुक्ती दिलेले तीनही पदाधिकारी या शिवसंपर्क अभियानाला अनुपस्थितीत राहिल्याचे पाहायला मिळाले होते. दापोली मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत थेट राष्ट्रवादीबरोबर केलेली आघाडी व तीन पदांच्या केलेल्या नियुक्त्या तेव्हापासूनच आमदार योगेश कदम नाराज होते. दरम्यान आता एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्याने त्यांनी केलेल्या या ट्विटला महत्व प्राप्त झाले आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here