मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी होत त्यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक मंत्री तसेच आमदार सूरतला निसटले. गेले अनेक दिवस या संदर्भातील योजना आकार घेत असताना पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणांना मात्र याचा काहीच थांगपत्ता नव्हता. इतकेच नाही तर हे सर्वजण सूरतला जाऊन काही तास उलटूनही पोलिसांना त्याचा थांगपत्ता नव्हता. संबंधित मंत्री; तसेच आमदार यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी त्यांच्या सोबत जे पोलिस कर्मचारी होते त्यांनीही या संदर्भात आपल्या वरिष्ठांना कल्पना दिली नाही. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन अशा सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

शिवसेनेचे जवळपास ३५ ते ४० आमदार अशाप्रकारे बंड करतात आणि त्याचा पोलिसांच्या गुप्तचर विभागाला जराही थांगपत्ता लागत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहमंत्रिपद असल्याने खुद्द शरद पवार यांनीच याविषयी नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. शिंदे यांच्यासोबत जे गेले त्यात खुद्द गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई; तसेच अब्दुल सत्तार हे मंत्री होते. याशिवाय इतर आमदार होते. या सर्वांना पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आहे.

शिंदेंसोबतचे ‘ते’ १६ आमदार अपात्र ठरणार? बंडखोरांना ४८ तासांत उत्तर द्यावं लागणार

अशा वेळी शिंदे त्यांच्यासोबत आमदार घेऊन महाराष्ट्राच्या सीमेबाहेर गुजरातला गेलेच कसे, याचा पोलिसांना थांगपत्ता कसा लागला नाही असा प्रश्न शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारल्याचे समजते. त्यामुळे आता गृहमंत्री वळसे पाटील यांनी या संदर्भात वरिष्ठ पोलिसांना एक अहवाल देण्यात सांगितले असून, त्यानुसार संबंधित पोलिसांवर कारवाई होणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here