maharashtra political crisis: शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिंदे यांना आवाहन करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता आव्हानाची भाषा केली आहे. त्यामुळे शिवसेना वि. शिंदेसेना संघर्ष आणखी पेटणार आहे.

हायलाइट्स:
- शिवसेनेच्या कार्यकारणीची आज बैठक
- उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार
- शिवसेना वि. शिंदेसेना संघर्ष आणखी तापणार
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आज मुंबईत होईल. या बैठकीला उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहतील. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीला अनेक महत्त्वाचे अधिकार आहेत. शिवसेनेच्या घटनेनुसार, पक्षप्रमुख सर्वोच्च आहेत. कोणालाही पक्षातून काढण्याचा सर्वोच्च अधिकार राष्ट्रीय कार्यकारणीकडे आहे. पक्षप्रमुख कार्यकारणीच्या सहमतीनं कोणत्याही नेत्याची हकालपट्टी करू शकतात.
शिवसेनेची घटना काय सांगते?
शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेत केवळ आमदार, खासदार नव्हे, तर जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुखांचाही समावेश आहे. २०१८ मध्ये २८२ सदस्यांकडून उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी निवड झाली. सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत १४ सदस्य आहेत. पैकी ५ जणांची नियुक्ती पक्षप्रमुखांकडून करण्यात आली आहे. २०१८ मध्ये एकनाथ शिंदेंसह चौघांची ठाकरेंकडून सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना आहेत.
शिवसेनेच्या कार्यकारणीत कोणाकोणाचा समावेश?
आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी (४ महिन्यांपूर्वी निधन), लिलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन किर्तीकर.
या नेत्यांची निवड पक्षप्रमुखांकडून- अनंत गिते, चंद्रकांत खैरे, एकनाथ शिंदे, आनंदराव अडसूळ
शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक; उद्धव ठाकरेंनी रणनिती बदलली
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : maharashtra political crisis shiv sena calls meeting of national executive committee after eknath shinde coup
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network