मुंबई : मुंबईमध्ये हल्ल्याच्या एक धक्कादायक प्रकार समोर आला असून इथे एका पतीनेच पत्नीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. दहिसर इथल्या एका रहिवाशाला घरातच पेपर कटरने पत्नीवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गुरुवारी ही घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज मुज्जावर (४२) असं आरोपीचं नाव आहे. फिरोजीची पत्नी फोनवर टीव्ही मालिका पाहत होती, त्यामुळे तो फिरोज त्याच्या पत्नीवर रागावला होता. त्याने तिची ही सवय मोडण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण तरीही ती मालिका पाहायची. यावरून त्यांच्यात अनेकदा मारामारी होत असे, असे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंबद्दल शिवसेना मोठा निर्णय घेणार?; ठाकरेंनी बोलावली ‘पॉवरफुल’ बैठक

गुरुवारी दुपारी त्यांच्यात असंच भांडण सुरू झालं. फिरोज हा जेवणासाठी घरी आले असता पत्नी फोनला चिकटलेली दिसली. फिरोडच्या मुलीने दहिसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिरोजने पत्नीला बेडरूममध्ये बोलावून आतून कडी लावली. पत्नीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता, मुलीने दरवाजा उघडण्याची विनंती केली. पण नंतर जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याच्या कपड्यांवर आणि जमिनीवर रक्ताचे डाग होते. तो रक्त साफ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला.

या घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळताच त्यांनी जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. तर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणावरून फिरोजला अटक केली आहे.

राजकीय अस्थिरतेने महापालिकेत चलबिचल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here