जालना : सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) पथकाने शुक्रवारी, शिवसेना नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित कारखान्यावर कारवाई केली. पथकाने सावरगाव हडप (ता. जालना) येथील रामनगर साखर कारखान्याची २०० एकर जमीन, कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री जप्त केली. खोतकर यांनी हा कारखाना खासगी पद्धतीनुसार चालविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे झालेल्या लिलावात विकत घेतला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी खोतकर यांच्या येथील निवासस्थानी, कार्यालयावरही ‘ईडी’ने छापा टाकला होता; तसेच या व्यवहाराशी संबंधित एका बांधकाम व्यावसायिकावर औरंगाबाद येथे आणि कारखान्याच्या मालकांकडेही तपास करण्यात आला होता.