Maharashtra political crisis | आसाम सरकारकडून या सगळ्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षिततेसाठी रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर स्थानिक पोलीस आणि केंद्रीय पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांचा आरोप पाहता या आमदारांच्या महाराष्ट्रात राहत असलेल्या कुटुंबीयांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

हायलाइट्स:

  • एकनाथ शिंदे असं कसं काय म्हणू शकतात?
  • ते महाराष्ट्राच्याबाहेर आहेत
  • त्यांनी गुवाहाटीला पलायन केले आहे
मुंबई: शिवसेनेचे तब्बल ४० आमदार गळाला लावून संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ शिंदे यांन गुवाहाटीतून एक नवे ट्विट केले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे सरकारने आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे आता शाब्दिक वाद रंगण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री आपल्या समर्थक आमदारांसह गुपचूप सूरतला निघून गेले होते. मध्यंतरीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या आमदारांसह आपला मुक्काम गुवाहटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये हलवला होता. सध्या या हॉटेलमध्ये शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. आसाम सरकारकडून या सगळ्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षिततेसाठी रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर स्थानिक पोलीस आणि केंद्रीय पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांचा आरोप पाहता या आमदारांच्या महाराष्ट्रात राहत असलेल्या कुटुंबीयांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आहेत मतभेद तरी, एकसारखीच रणनीती ठरली; एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचा ‘सेम टू सेम’ प्लान
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. एकनाथ शिंदे असं कसं काय म्हणू शकतात? ते महाराष्ट्राच्याबाहेर आहेत. त्यांनी गुवाहाटीला पलायन केले आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत स्वत:चे सुरक्षारक्षक नेले आहेत. त्यांना जी सुरक्षा आहे ती आमदार म्हणून आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची सुरक्षा नसते. तुम्ही असे वणवण भिकाऱ्यासारखे का भटकत आहात. राज्यात परत या, या महाराष्ट्राची इभ्रत धुळीला मिळवू नका. एकनाथ शिंदे स्वत:ला वाघ म्हणवतात, मग त्यांनी बकरीसारखं वागू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shiv sena leader sanjay raut slams eknath shinde accusations about thackeray govt withdraws rebel mlas family security
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here