Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. राज ठाकरे यांच्यावर 20 जून रोजी लिलावती रुग्णालयात हिप बोनची शस्त्रक्रिया झाली. राज यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत आपल्याला डिस्चार्ज मिळाल्याची माहिती दिली आहे. 

राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहीलं आहे की, ‘आपल्या आशिर्वादानं आणि प्रार्थनेनं माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली. मी काही वेळापूर्वीच रुग्णालयातून घरी पोहोचलो आहे. आपले आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम असू दे.’

डॉक्टरांनी त्यांना पुढचे दोन ते तीन महिने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या दरम्यान राज ठाकरे यांना कोणतीही सभा, भाषण किंवा मीटिंग घेता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. जलील पारकर आणि डॉ. विनोद अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

राज ठाकरे यांच्यावर 20 जून रोजी हिप बोनची दीड तास शस्त्रक्रिया चालली. ऑपरेशन दरम्यान त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांना पाच दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं. रुग्णालयात त्यांना फिजिओथेरपी देण्यात आली. यानंतर त्यांना आज डिस्चार्ज मिळाला असून त्यांच्यावर घरीसुद्धा फिजिओथेरपी आणि उपचार करण्यात येतीलल. पुढचे दोन ते तीन महिने त्यांना आराम करावा लागेल.

हिप बोन म्हणजे नेमकं काय?

हिप बोन म्हणजे कमरेच्या हाडांना होणारा त्रास. विशेष म्हणजे हा त्रास आपल्याला रोज जाणवत नाही तर, अचानक शरीराच्या एका विशिष्ट भागात तणाव जाणवतो. हिप बोनचा त्रास सांध्यांमध्ये जास्त जाणवतो. अधिकतर हा त्रास स्नायू आणि हाडांवर जास्त दबाव आल्यामुळे होतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here