उस्मानाबाद : राज्यात शिवसैनिकांच्या रागाचा लोळ वाढत असून आता तोच रोष उस्मानाबाद जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे. शिवसेनेचे माजी मंत्री बंडखोर आमदार तानाजी सावंत याच्या कार्यालयाची उस्मानाबाद येथील शिवसैनिकानी तोडफोड करुन सावंत यांच्या पोस्टरला काळे फासले. इतकंच नाहीतर त्यांचे पुण्यातील कार्यलयही शिवसैनिकांकडून फोडण्यात आलं आहे.

‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी आमदार तानाजी सावंत याचे उस्मानाबाद येथील संपर्क कार्यालयाची तोडफोड केली. उस्मानाबाद जिल्हा हा शिवसेनेचा जिल्हा आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा म्हणून याची ओळख आहे. पण गद्दार तानाजी सावंत यांना शिवसेनेने मंत्री पद दिले. या गद्दारचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं आहे.

पुण्यात शिवसैनिक भडकले, तानाजी सावंत यांचं कार्यालय फोडलं
पुण्याच्या कार्यालयाचीही तोडफोड…

राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक झालेली पहायला मिळत आहेत. अनेक शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातही शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. यामुळे सध्या परिसरात वातावरण तापलं आहे.

ही तोडफोड नेमकी कोणी केली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यानंतर तानाजी सावंत आणि त्यांचे कात्रज येथील मुख्य कार्यालय आणि आणि घराबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Weather Alert : राज्यावर पुढचे ५ दिवस आस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here