पॅरिस: चीननंतर करोनाच्या संसर्गाचे केंद्र झालेल्या युरोपमध्ये थैमान सुरूच आहे. युरोपीयन देशांमध्ये मृत्यूचे तांडव सुरू असून शनिवारी ही संख्या एक लाखापर्यंत पोहचली. जगभरातील एकूण मृत्यूंपैकी युरोपचे प्रमाण दोन तृतीयांश एवढे आहे.

जगभरातील जवळपास २०० हून अधिक देशांमध्ये फैलावला आहे. करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील विविध देशांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. जगभरात जवळपास एक लाख ६० हजारजणांचा मृत्यू झाला आहे. युरोपीयन देशांमध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे. युरोपमध्ये ११ लाख ३६ हजारांहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर, एक लाख जणांचा मृत्यू झाला आहे. इटली व स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत. तर, या दोन देशांसह जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आदी देशांमध्ये ही करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

वाचा:

वाचा:

स्पेनमध्ये जवळपास एक लाख ९५ हजारजणांना करोनाची बाधा झाली असून २० हजार ५०० हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, इटलीमध्ये एक लाख ७५ हजारजणांना करोनाची बाधा झाली असून २३ हजारांहून अधिकजणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये एक लाख ५० हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, १९ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये रुग्णांची संख्या एक लाख १४ हजारांहून अधिक झाली असून १५ हजार मृतांची नोंद करण्यात आली आहे. जर्मनीमध्ये इतर युरोपीयन देशांच्या तुलनेत बाधितांची संख्या आणि मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. जर्मनीत एक लाख ४३ हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली असून ४५०० जणांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here