jalna news today: संदुकात सापडल्या तब्बल ९ नव्याकोऱ्या तलवारी, खबऱ्याने दिलेल्या टीपनंतर पोलिसही चक्रावले – a 9 new swords were found in the box in jalna
जालना : जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींची माहिती घेऊन त्यांचा शोध घेणेबाबत जालन्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी कंबर कसली आहे. याच तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची तीन वेगवेगळी पथकं तयार करुन जालना जिल्हा हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींची माहिती घेऊन शोध घेत असतांना खबऱ्यामार्फत मोठी माहिती मिळाली. शेख कलीम शेख शरीफ रा. वाल्मीक नगर जालना याने त्याच्या घराजवळील पत्राचे शेडमध्ये एका संदुकामध्ये तलवारी लपवून ठेवल्या असल्याचं समजलं. शिवसेनेचे १० खासदार भाजपच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याच्या दाव्यामुळे राजकीय खळबळ ही माहिती मिळाल्यावर पथकाने धाव घेत शहरातील वाल्मीकनगर भागातील एका पत्राच्या शेडची झडती घेतली असता त्यामध्ये एक लोखंडी पेटीमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या धारदार नऊ तलवारी म्यानसह सापडल्याने पोलिसही चक्रावले.
सदरच्या तलवारी या शेख कलीम शेख शरीफ रा. वाल्मीक नगर जालना याने त्याचा मित्र नामे आफरोज हफीज पठाण रा.मंगळबाजार जालना याच्या मार्फत एका व्यक्तीकडून खरेदी केल्याचे सांगितले असले तरी एवढा मोठा तलवारींचा साठा का जमावण्यात आला? या तलवारी कुठून आल्या? आतापर्यंत किती तलवारी विकल्या गेल्या? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.