ठाणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातल्या सत्तासंग्रामाला आज शनिवारी हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं आहे. पुण्यात तानाजी सावंत यांच्या ऑफिसची संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तोडफोड केली. तर आज शिवसेनेचे कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरमध्ये असलेल्या कार्यालयावर शिवसेनेच्या संतप्त शिवसैनिकांनी दगडफेक करत कार्यालय फोडले आहे. तोडफोड करणारे लोक शिवसेनेचे असल्याचा आरोप बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी केला आहे. तर तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या ३५ पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे. त्यामुळे शिंदें विरुद्ध उद्धव ठाकरे अशी स्थिती सध्या पहायला मिळत आहे. बंडामुळे आता शिवसेनेचे कार्यकर्तेही एकनाथ शिंदेवर नाराज झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरमधील असलेल्या कार्यालयावर दगडफेक करत कार्यालय फोडले आहे.

Shivsena vs Tanaji Sawant: शिवसेनेच्या ‘खळखट्याक’ला तानाजी सावंतांचं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले, ‘औकातीत राहा’
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिक पेटून उठले आहेत. राज्यातील विविध शहरात बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक निदर्शने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात विशेषत: मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज मुंबई पोलीस आयुक्तांनी मुंबई पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेविषयी चर्चा केली. त्यानंतर मुंबईत १० जुलैपर्यंत जमाव बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हणून शिंदे गटाचा काँग्रेस, राष्ट्रवादीशी ३६चा आकडा; २१+१५मुळे बंडाचा पवित्रा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here