एकानाथ शिंदे यांच्यासह पहिले १२आमदार आणि चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर,रमेश बोरणारे यांच्यासह १६ आमदारांना विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीस पाठवली आहे.

 

Narhari Zirwal
नरहरी झिरवाळ

हायलाइट्स:

  • विधानसभा उपाध्यक्षांकडून कारवाई सुरु
  • १६ आमदारांना नोटीस
  • ४८ तासांमध्ये उत्तर देण्याची सूचना
मुंबई : महाराष्ट्रात निर्माण झालेला राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे आहेत. अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी बंडखोर आमदारांवर कारवाई करु नये यासंबधी पत्र दिलं होतं. ते पत्र फेटाळण्यात आलं आहे. शिवसेनेनं २३ जून आणि २४ जून रोजी एकूण १६ जणांची आमदारकी रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. शिवसेना नेते अरविंद सावंत, अनिल देसाई, सुभाष देसाई यांनी काल विधिमंडळात विविध मुद्यांवर त्यांची बाजू मांडली होती. विधानसभा उपाध्यक्षांकडून आज दुपारी ४ वाजलेपासून १६ बंडखोर आमदारांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना येत्या ४८ तासांमध्ये उपस्थित राहून त्यांची बाजू मांडण्यास सांगितलं जाऊ शकतं.

कोणत्या आमदारांना नोटीस
एकनाथ शिंदे, तानाजी सावंत,प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर,लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार, महेश शिंदे , चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर,रमेश बोरणारे या आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नोटीस पाठवणार आहेत.
काय झाडी… काय डोंगर… बंडखोर आमदार शहाजीबापू वापरताहेत ही ३५ लाखाची गाडी
विधानसभा उपाध्यक्षांकडे १६ आमदारांवर कारवाईची मागणी
शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १२ जणांची आमदारकी रद्द करावी, यासंदर्भातील याचिका २३ जूनला नरहरी झिरवाळ यांच्याकडे देण्यात आल्या होत्या. काल चिमणआबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी कल्याणकर,रमेश बोरणारे जणांवर कारवाई करावी म्हणून शिवसेनेनं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे याचिका दाखल केली होती.
आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी पैसा कुणाचा? ईडीने चौकशी करावी, राष्ट्रवादी आक्रमक
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही रस्त्यावरील आणि कायदेशीर लढाई लढत राहू, असं संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेना महावकिास आघाडी सरकार रस्त्यावरील आणि कायदेशीर लढाई जिंकेल, असं संजय राऊत म्हणाले. आज झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना त्यांना त्यांचा निर्णय घेऊ द्या, असं सांगितलं. शिवसेनेत पुन्हा गद्दारांना स्थान नको, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी मांडली. आजच्या बैठकीत रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.
हिम्मत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra assembly deputy speaker narhari zirwal sent notice to 16 rebel shivsena mla
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here