शिंदे समर्थक आक्रमक ! एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांचं शक्तिप्रदर्शन
बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यात हजारो लोक जमले आहेत. ‘आम्ही भाई समर्थक’, असे पोस्टर्स कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले आहेत. ‘नेता कैसा हो, एकनाथ शिंदे जैसा हो..’, ‘एकनाथ भाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हो’, अशा घोषणांनी ठाणे दुमदूमून गेलं होतं. एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे अनेक नगरसेवक, सेना पदाधिकारी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जवळपास ५० आमदारांचा विश्वास आहे. एवढ्या सगळ्या आमदारांनी त्यांना पाठिंबा का दिला, याचा विचार पक्षनेतृत्वाने करावा. मुख्यमंत्री लोकांना भेटत नाहीत. त्याचवेळी शिंदेसाहेबांचे दरवाजे सगळ्या आमदारांसाठी उघडे होते. कोरोना काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता काम केलं. ५० आमदारांच्या मनात मविआ सरकारबद्दल खदखद आहे. सत्तेत असूनही निधी मिळत नाही. नेते कार्यकर्त्यांची कामं होत नाही. आमदारांची खदखद मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली होती. अडीच वर्ष पक्ष वाढला नाही तर खाली गेला. कोरोना काळात सर्व नगरसेवकांना शिंदे साहेबांनी निधी दिला. इतिहासात इतका असंतोष कधी नव्हता, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. सगळ्या आमदारांच्या मनातील खदखद पक्षनेतृत्वाने समजून घ्यावी. आमदारांच्या बंडाबाबत गंभीर विचार व्हावा, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.
श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
-शिंदेंसाहेबांच्या घराचे दरवाजे सामान्यांसाठी सदैव खुले आहेत
– हिंमत असेल तर समोर येऊन लढा
– धर्मवीरांच्या शिकवणीमुळे अजून शांत आहोत
– मविआ स्थापनेनंतर तक्रारी का वाढल्या?
– जीवाची पर्वा न करता शिंदेंनी अहोरात्र काम केलं
– दोनदा करोना होऊनही शिंदेंनी काम सुरुच ठेवलं